असेल कोणीतरी..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारी
माझ्याचसाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझं एकाकीपणा संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझं दु:ख आपलं मानणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
केवळ माझ्याचसाठी जगणारी
आणि माझ्याचसाठी मारणारी..
हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...
साथ तू देशील का...
Post a Comment