पुन्हा चांदणे विरघळू लागले..
पुन्हा चांदणे विरघळू लागले
पुन्हा चांदव्याला छळू लागले...
कधी शब्द सांगायचे ते तुला
इशाऱ्यातुनीही कळू लागले...
इशाऱ्यातुनीही कळू लागले...
असा ये जवळ... मोग-यासारखा,
तुझे श्वासही दरवळू लागले...
तुझे श्वासही दरवळू लागले...
तुझ्या श्रावणावर झुलू मी किती ?
इथे मन अधिक हिरवळू लागले..
इथे मन अधिक हिरवळू लागले..
पुसावे कसे ते ठसे अन् खुणा...?
क्षणांतून जे आढळू लागले...
क्षणांतून जे आढळू लागले...
तुझ्या उष्णस्पर्शी मिठीने सख्या
शहारून मी विरघळू लागले...
शहारून मी विरघळू लागले...
Post a Comment